सामाजिक उपक्रम
रिद्धी जान्हवी फाऊंडेशनतर्फे आदिवासी मुलांना कपडे व बिस्किट वाटप

- जळगाव आज दिनांक 11/11/2020 रोजी जळगाव तालुक्यातील आदिवासी वस्ती आलेल्या भागपूर गावात दिवाळी निमित्त मुलांना कपडे व बिस्कीट पुडे वाटप करण्याचा कार्यक्रम रिद्धी जानवी फाऊंडेशन च्या वतीने संपन्न झाला.
या कार्यक्रमात सुरुवातीला रिद्धी जानवी फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा सौ.चित्रलेखा मालपाणी यांनी मुलांना कपडे,व बिस्कीट वाटप केले त्यानंतर संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.पद्मावती राणा यांच्या हस्ते कपडे वाटप करण्यात आले.त्यावेळी कार्यक्रमाला शाहू ब्रिगेड चे श्री.किरण भाऊ कोलते,सौ.सविता कोलते,सौ।पल्लवी इंदानी ह्या उपस्थित होत्या.तसेच कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते श्री.राजू भाऊ पाटील नशिराबाद आणि जळगाव येथील नूर सर यांची मोलाची साथ लाभली.आभार प्रदर्शन करीत असताना संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ.चित्रा मालपाणी यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.