क्राईम

रूग्णालयातील नवजात शिशु कक्षाला आग, दहा बालकांचा गुदमरून मृत्यू

भंडारा दि-०९ः- येथील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनीटमध्ये ( SNCU ) शॉर्ट सर्किटने आग लागल्याने दुर्दैवाने दहा बालकांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे राज्यभर प्रचंड खळबळ उडालेली आहे. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ही आग लागली होती. धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बॉर्न युनिट मधून धूर निघत असल्याचे समोर आले. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितला असता त्या कक्षात मध्ये मोठ्या प्रमाणात धूर जमा झालेला होता. त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील डाॕक्टर व इतर अधिकाऱ्यांना सांगितले.


घटनास्थळी तात्काळ अग्निशामक दल बंब पोहोचले.तसेच दवाखान्यातील कर्मचारी व लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आलेले होते. या SNIC मध्ये आउटबॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटर मध्ये असलेल्या सात बालकांना मात्र वाचविण्यात यश आलेले आले. तर आऊट बॉर्न युनिटमधील 10 मुलांचा मृत्यू झाला. या सामान्य रुग्णालयात जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलिस अधिक्षक वसंत जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी दाखल होत पाहणी केलेली आहे.या संपूर्ण रुग्णालयाला आता पोलिसांचा वेढा असून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.याठिकाणी आरोग्य उपसंचालक संजय जयस्वाल नागपूर येथून भंडारा रुग्णालयात पहाटेच 5.45 वाजेच्या सुमारास दाखल झालेले आहेत. या दुर्दैवी आणि गंभीर घटनेबाबत प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक संपलेली असून ताबडतोब चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.