रेल्वे संबंधी

रेल्वेच्या रद्द केलेल्या आरक्षित तिकिटांचा परतावा मिळवण्यासाठीच्या कालमर्यादेत वाढ

रेल्वेने नियमित वेळापत्रकातील रेल्वेच्या रद्द केलेल्या गाड्यांसंदर्भातच हे लागू आहे.

भुसावळ- रेल्वे मंत्रालयाने प्रवासाच्या दिनांक 21/03/2020 ते 31/07/2020 या कालावधीसाठी आरक्षित केलेली पीआरएस काउंटर तिकिटे रद्द करण्यासाठी व आरक्षण खिडकीवरून त्याचा परतावा मिळवण्यासाठी घातलेली कालमर्यादा प्रवासाच्या दिवसांपासून सहा महिने होती ती आता वाढवून नऊ महिन्यांपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. जर आरक्षित तिकीट 139 मधून वा आयआरसीटीसी संकेतस्थळावरून रद्द केले गेले असेल तर असे तिकीट प्रवासाच्या दिनांका पासून नऊ महिन्यात आरक्षण खिडकीवर परत करता येईल. प्रवासाच्या दिवसापासून सहा महिने उलटून गेल्यामुळे, अनेक प्रवाश्यांनी आपली मूळ तिकिटे विभागीय रेल्वेच्या दावा कार्यालयात TDR किंवा साध्या अर्जासहित जमा केली असतील, प्रवाश्यांना अश्या पीआरएस काउंटर तिकीटांचा परतावा देण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. याआधी, कोविड-19 महामारीच्या परिस्थितीत तिकीटे रद्द करणे तसेच त्यांचा परतावा देणे याबाबत सविस्तर मार्गदर्शक नियमावली जारी करण्यात आलेली होती.असे रेल्वेच्या जनसंपर्क विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.