रेल्वे संबंधी

रेल्वेतर्फे तिन विशेष अतिरिक्त आरक्षित प्रवासी गाड्या

भुसावळ – रेल्वे प्रशासनातर्फे यात्री सुविधासाठी अतिरिक्त तीन विशेष प्रवासी गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.या गाड्या मुंबई- नागपूर ,पुणे-नागपूर , नागपूर-अहमदाबाद या दरम्यान चालविण्यात येणार आहेत. या तिन्ही गाड्यांना संपूर्ण आरक्षण लागू असणार आहे. याचे विवरण पुढील प्रमाणे
1) मुंबई-नागपूर विशेष गाडी दररोज
गाडी क्रमांक 02169 डाऊन मुंबई-नागपूर विशेष गाडी दिनांक 21/01/2021 पासून पुढील आदेशापर्यंत मुंबईहून दररोज 14.55 वाजता रवाना होईल आणि नागपूरला दुसऱ्या दिवशी 05.45 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 02170 अप नागपूर-मुंबई विशेष गाडी दिनांक 20/01/2021 पासून पुढील आदेशापर्यंत नागपूर हुन दररोज 21.10 वाजता रवाना होईल आणि मुंबईला दुसऱ्या दिवशी 12.00 वाजता पोहोचेल.
स्टॉप- देवळाली, नाशिक, निफाड, लासलगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला , मुर्तीजापुर,बडनेरा
2) नागपूर-अहमदाबाद विशेष गाडी साप्ताहिक
गाडी क्रमांक 01137 अप नागपूर अहमदाबाद विशेष गाडी ही दिनांक 20/01/2021 पासून पुढील आदेशापर्यंत नागपूर हून दर बुधवारी 08.15 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी अहमदाबादला 00.35 वाचता पोहोचेल.
गाडी क्रमांक 01138 डाउन अहमदाबाद नागपूर विशेष गाडी ही दिनांक 21/01/2021 पासून पुढील आदेशापर्यंत अहमदाबाद हुन दर गुरुवारला 18.30 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी नागपूरला 10.25 वाजता पोहोचेल.
स्टॉप- बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव
3) नागपूर-पुणे सुपरफास्ट एसी विशेष गाडी
गाडी क्रमांक 02114 अप नागपूर पुणे AC विशेष गाडी ही दिनांक 19/01/2021 पासून पुढील आदेशापर्यंत नागपूर हून दर मंगळवार,शुक्रवार,रविवार ला 18.00 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी पुणे ला 09.05 वाचता पोहोचेल.
गाडी क्रमांक 02113 डाउन पुणे नागपूर AC विशेष गाडी ही दिनांक 20/01/2021 पासून पुढील आदेशापर्यंत पुणे हून दर बुधवार,शनिवार,सोमवार ला 17.40 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी नागपूर ला 09.10 वाचता पोहोचेल.
स्टॉप- बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, मनमाड आरक्षण: पूर्णतः आरक्षित सुपरफास्ट विशेषच्या अतिरिक्त गाड्यासाठी बुकिंग दिनांक 18/01/2021 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू होईल.
संबंधित विशेष रेल्वेगाड्यांच्या स्थानकांच्या थांब्यांच्या तपशील वार वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा

NTES अॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड-19 संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल. असे भुसावळ रेल्वे विभागातर्फे आज दिनांक- 16/01/2021
NO-PR/2021/01/18 प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.