क्राईम

रेल्वे टिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या महालक्ष्मी ट्रॕव्हल्सवर छापा

भुसावळःदि-9 रोजी भुसावळच्या वाणिज्य विभागाचे प्रमुख सीनियर डी सी एम तथा आरपीएफ विभागाचे प्रमुख सीनियर डी एस सी यांच्या मार्गदर्शनानुसार भुसावळच्या एटीएस पथकाचे श्री हेमंत सावकारे, ए एस राजपूत , प्रशांत ठाकूर जळगावचे रेल्वे स्टेशनचे आरपीएफ इंस्पेक्टर श्री सी एस पटेल , यांनी सापळा रचून खानदेश मिल्क कॉम्प्लेक्स मधील दुकान नंबर 19 महालक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यावर रेल्वे तिकिटांचा काळाबाजार संबंधात छापा टाकला महालक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हल चे मालक संजय मोतीराम चौधरी वय 53 वर्ष त्यांना अटक केली त्यांच्याकडून 4 रेल्वे काउंटर वरचे आरक्षण तिकीट आणि 7 इंटरनेटचे ई टिकीट जो आपल्या पर्सनल आयडीवर तिकीट बनवून लोकांना विकत होता जास्त कमिशन घेत होता तो बस आणि रेल्वेचे ऑनलाइन कमिशन वर तिकीट बुक करत होता त्याच्याकडे कोणतही रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी अधिकृत लायसन्स नाही त्याच्याकडून 6733/-रुपयांचे तिकीट मिळाले. ई तिकीट काढण्यासाठी वापरण्यात आलेले कंप्यूटर मोबाईल हे जप्त करण्यात आले. त्याला भुसावळच्या रेल्वे कोर्टात हजर केले असता चौकशीसाठी एक दिवस पोलीस रिमांड मध्ये ठेवण्यात आले आहे आरपीएफ स्टेशनचे ए एस आय जी एम घंगे, एल एस आय शिंदे मॅडम कॉन्स्टेबल रेहान कॉन्स्टेबल भुषण पाटील आणि जळगाव शहर पोलीस विभागाचे दोन कॉन्स्टेबल यांची मदत लाभली.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.