आरोग्य

रेल्वे स्टेशन मार्गावर अपघात, एक जण ठार

मयुरेश निंभोरे , मो.- 9325250723

सावदा ( प्रतिनिधी )- येथून जवळच असलेल्या सावदा ते सावदा रेल्वे स्टेशन मार्गावर असलेल्या लहान वाघोदा मार्गावर असलेल्या बस स्थानका समोरच दि-१० रोजी संध्याकाळी ६.३० वाजेच्या सुमारास बोलेरो या चारचाकी वाहनाने मोटारसायकल स्वारास समोरून धडक दिल्याने या घटनेत मोटारसायकल स्वाराच्या डोक्याला जबर गंभीर दुखापत झाल्याने २९ वर्षीय युवक जागीच ठार झाला. यामुळे गाते गावावर शोक कळा पसरली आहे .या बाबत सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की ; मयत मयूर राजेंद्र तायडे ( कोळी ) वय २९ हा गाते येथील रहिवाशी असून संध्याकाळी ६.३० वाजेच्या सुमारास सावदा येथून घरी परतीच्या वेळेस मोटारसायकल क्रमांक एम एच १९- सी एल ०२९८ वरून जात असताना लहान वाघोद्या जवळच बसस्थानाक जवळ रेल्वेस्टेशन कडून येणाऱ्या पांढऱ्या रंगाची बोलेरो क्रमांक एम.पी.१२डी सि ०४६९ या वाहनाच्या चालकाने रस्त्याचा विचार न करता ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवत असताना वाहनांच्या चालक साईटला मोटारसायकल स्वारास जबर धडस, बसल्याने या घटनेत मोटारसायकल चालकास डोक्यास जबरदस्त दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना घडली मात्र बोलेरो वाहनाचा चालक घटनास्थळ वरून फरार झाल्याने या बाबत अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळताच स.पो.नि .राहुल वाघ पी एस आय राजेंद्र पवार,रवींद्र मोरे,युसूफ तडवी,मेहेरबान तडवी,संजय मोरे यांनी धाव घेतली .मयताचे शवविच्छेदनासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आलेले आहे. या बाबत आकाश शांताराम तायडे (कोळी ) यांनी दिलेल्या खबरीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.