रोटरीच्या विविध पदांवर भुसावळातील तिघांची नियुक्ती

भुसावळ- आंतर राष्ट्रीयरोटरी क्लब च्या असीस्टंट रीजनल रोटरी फाऊंडेशनच्या कोर्डीेनेटर पदी राजीव शर्मा, डीस्ट्रीक्ट जॉईन्ट सेक्रेटरी ३०३० पदी धमेंद्र मेंडकी यांची तर डीस्ट्रीक्ट रोटरॅक्ट रिप्रेझेन्टेटीव पदी लोकेश कंसल यांची निवड झाल्याने रोटरी क्लब ऑफ भुसावल ताप्ती व्हॅली च्या वतीने गौरव करण्यात आला.
रोटरी इन्टरनॅशनल हि संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहे.या माध्यमातून समाजातील वंचीत घटकांपर्यंत विवध योजना पोहचविल्या जात असतात. यासाठी गेल्या अनेक वर्षापासून रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅलीचे माजी प्रांतपाल राजीव शर्मा आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहे. या कामाची दखल घेवून त्यांना रोटरी च्या वतीने भारताच्या पूर्व भागातील झोन क्रमांक ६ च्या असीस्टंट रीजनल रोटरी फाऊंडेशनच्या कोर्डीनेटर पदी पुन्हा नियुक्ती करणयात आली. तसेच रोटरी क्लब ३०३० चे माजी asstt गव्हर्नर धमेंद्र मेंडकी यांची डीस्ट्रीक्ट जॉईन्ट सेक्रेटरी ३०३० पदी नियुक्ती झाली असुन तरूण मुलांची रोटरॅक्ट च्या डीस्ट्रीक्ट रोटरॅक्ट रीप्रेझेन्टेटीव्ह २१-२2 साठी लोकेश कान्सल यांची निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी रोटरी क्लब ऑफ भुसावल ताप्ती व्हॅली चे प्रोजेक्ट सेक्रेटरी संजू भटकर, योगेश इंगळे, जीवन महाजन, प्रदिप सोनवणे, समाधान जाधव, किशोर पाचपांडे सुनिल वानखेडे आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजीव शर्मा म्हणाले की, शहरासह परीसरात रोटरीच्या कार्याची व्याप्ती वाढवायची आहे.येणाऱ्या काळात सामाजीक कार्याच्या माध्यमातून समाजीतील वंचीत घटकापर्यंत पोहचायचे आहे.यासाठी सर्वांनी एकत्रीत प्रयत्न केल्यावरच शक्य होणार आहे.