आरोग्य

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार,बळजबरीने केला गर्भपात

यावल – यावल तालुक्यातील अट्रावल येथील 25 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वर्षभर शारीरिक संबंध ठेवत लैंगिक अत्याचार केले. तिला बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडले .तसेच लग्नाला नकार दिल्याने संबंधित तरूणा विरोधात यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की यावल तालुक्यातील अट्रावल येथील रहिवाशी श्रावण कैलास कोळी याने पीडित तरूणीशी परिचय वाढवून प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. यानंतर विश्वासात घेत तुझ्याशी मी लग्न करेल असे आमिष दाखवले.तिच्यासोबत 1 सप्टेंबर 2019 पासून ते 5 डिसेंबर 2020 दरम्यान संशयिताच्या गावातील राहत्या घरी व इतर ठिकाणी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले . त्यातून ती गरोदर झाल्याने तिला बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून गर्भपातासाठी भाग पाडले .आणि वर्ष उलटूनही संबंधिताने लग्न केले नाही . पीडितेने लग्नासाठी आग्रह धरल्यावर श्रावण कोळीने लग्नाला नकार दिला .याप्रकरणी पीडितेने यावल पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून श्रावण कोळी विरुद्ध बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.