जळगावमुंबईराजकीय

विधानसभेत भुसावळचे आ.संजय सावकारेंचा धमाका ! जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा तारांकित प्रश्न रोखठोक मांडला!

नागपूर, दि. २०: बघा विधानसभेत आ.संजय सावकारे व मंत्री गिरीश महाजन यांच्यात प्रश्नोत्तराच्या तासात झालेली रोखठोक जुगलबंदी

source mla.org.in

राज्यातील जिल्हा परिषदांच्या सर्व शाळांमध्ये सौर यंत्रणा बसवण्याबाबत गांभीर्याने विचार करण्यात येईल. तसेच जळगाव जिल्ह्यातील शाळांमध्ये सोलर सिस्टीम बसविण्याची प्रलंबित कार्यवाही येत्या दोन महिन्यात पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत दिली.
भुसावळचे भाजपचे आमदार संजय सावकारे यांनी जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या संदर्भातील तारांकित प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता.
मंत्री श्री.गिरीष महाजन यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की, शासकीय आश्रम शाळा, लालमाती, ता. रावेर येथे सन २०११ मध्ये सौर यंत्रणा बसविण्यात आले होत. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१९-२० अंतर्गत अपारंपारिक ऊर्जा विकास या योजनेतून रावेर तालुक्यातील १७ जिल्हा परिषद शाळांवर सौर यंत्रणा बसविण्यात आले होते. मात्र, शासकीय आश्रम शाळा लालमाती, ता. रावेर येथील सौर यंत्रणा नैसर्गिक आपत्तीमुळे (वादळामुळे) काही युनिट बंद पडले आहेत. ही बंद युनिट तातडीने सुरू करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
यावेळी आमदार राजेश टोपे , प्राजक्त तनपुरे, प्रकाश आबिटकर आणि ॲड. यशोमती ठाकूर यांनीही यासंदर्भातील चर्चेत सहभागी होऊन उपप्रश्न विचारले.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button