लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॕकमेलिंग करणाऱ्याला अटक


भुसावळ-भुसावळ शहरातील सुरभी नगर,गणपती मंदिर जवळील रहिवाशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पीडित मुलगी यांच्या घरी आरोपी अमित कुमार अशोक कुमार भूमिहार हा दिनांक 27/09/2019 रोजी येऊन त्याने पीडित मुलीस लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबध प्रस्थापित करून तिच्या इच्छेविरोधात घटनेचा अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅक मेलिंग करत पीडित मुलीस धमकविल्या प्रकरणी लष्कराच्या जवाना विरोधात दिनांक 27 ऑगेस्ट 2020 रोजी सायंकाळी 6.25 वाजेला बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ शहरातील सुरभी नगर,गणपती मंदिर जवळील रहिवाशी पीडित मुलगी व आरोपी याची फेसबुक वरती ओळख झाली व पीडित मुलीची भुसावळात एका सार्वजनिक बँकेत सप्टेंबर महिन्यात नियुक्ती झालेली होती.त्यानंतर आरोपी लष्करी जवान अमित कुमार अशोक कुमार भूमिहार ह्या आरोपीने पीडित मुलीच्या राहते खोलीत जाऊन बळजबरीने शारीरिक संबध प्रस्थापित केले.तसेच पीडित मुलीच्या मर्जी विरुद्ध अश्लील व्हिडिओ बनवून पुन्हा व्हायरल करेल असे आरोपी अमित कुमार अशोक कुमार भूमिहार यांनी सांगून ब्लॅक मेलिंग करीत धमकविल्याप्रकरणी दिनांक 27 ऑगेस्ट 2020 जी सायंकाळी 6.25 वाजेला भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरुन ०८०३/२०२० भाग-५ भा.द. वि.कलम ३७६, ३७६(२)(एन),५०६,६६(ई),६७,६७(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.गुन्ह्याचा पुढील तपास बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत करीत आहे.आरोपीना न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे.