लालपरि ही ग्रामीण भागाची जीवनदायीनी – सुनिल वानखेडे सर

भुसावळ -देशात रेल्वेचे जाळे असले तरी अनेक भागात रेल्वे पोहचू शकली नाही. ग्रामीण भागाची जीवनदायनी म्हणून बस कडे बघीतले जाते. शहर व ग्रामीण भागाची नाळ बस मुळे जोडली गेली आहे. बसचा प्रवास सुखकर असुन विद्यार्थी, दिव्यांग, वयोवृध्द यांना बस भाड्यात विशेष सवलत देण्यात येते. सुरक्षीत प्रवासासाठी प्रसंगी वेळ लागला तरी खाजगी वाहतुकी पेक्षा बस च्या प्रवासाला प्रत्येक प्रवाशाने प्राधान्य दिल्यास अपघात टाळता येवू शकतात. तसेच परिवहन मंडळाला या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी मदत होईल. यामुळेच लालपरि ही ग्रामीण भागाची जीवनदायनी असल्याचे प्रतीपादन प्रवासी सुरक्षीतता मोहिम उद्घाटन वेळी केले. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट महाराष्ट्र संचालक सुनील वानखेडे यांनी केले
भुसावळ आगारात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा तर्फे विना अपघात सुरक्षितता मोहिम १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान एक महिना राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे उद्घाटनाचा कार्यक्रम भुसावळ आगारात आयोजित करण्यात आला होता.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भुसावळ आगार प्रमुख पी.बी. चौधरी होते तर उद्घाटक तथा प्रमुख पाहुणे म्हणुन एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ सायंटिस्ट महाराष्ट्र चे संचालक सुनिल वानखेडे होते. यावेळी सहाय्यक कार्यशाळा अधिकारी जी.टी.देवरे, हेड मेकॅनिक पी.आर. चव्हाण, पी.के.पाटील,नितीन मोरे, वरिष्ठ लीपीक पी.टी.चौधरी, सहाय्यक वाहतुक निरीक्षक आर.एस.पाटील, निता कापसे कामगार संघटना प्रसिध्दी सचिव धर्मराज देवकर आदि उपस्थित होते.यावेळी अध्यक्षीय भाषणात पी.बी. चौधरी म्हणाले की सर्वसामन्यांचे दळवळणाचे महत्वाचे साधन म्हणून बस कडे बघीतले जाते. ग्रामीण भागातील लहनात लहान खेड्यापर्यंत बस च्या माध्यमातून प्रवास होत असतो. बस मधे बसणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचा सुरक्षीत प्रवास झाला पाहिजे याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन विभागाची असुन परिवहन विभागाने नेमून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन झाल्यास प्रवाशांचा सुरक्षीत प्रवास होतो. यासाठी नियमांचा अवलंब केला पाहिजे प्रवाशांचे हित, सुरक्षीत प्रवास हेच महामंडळाचे ब्रिद असुन महामंडळाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन झाल्यास निश्चीत पणे सुरक्षीत प्रवास होवू शकतो. येणाऱ्या दररोजच्या अडचणीमधून मार्ग काढुन चांगल्यात चांगली सेवा प्रवाशांना दिली पाहिजे. यामुळे परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात भर पडेल.यासाठी सर्वच कर्मचारी कसोशीने प्रयत्न करत असतात.
कामगार संघटनेचे प्रदेश सचिव धर्मराज देवकर म्हणाले की, प्रवाशांचा आजही विश्वास परिवहन महामंडळावर दृढ आहे.लांब पल्ल्याचा प्रवास असो अथवा जवळचा प्रवास. यासाठी प्रवाशी बस च्या प्रवासाला प्राधान्य देतात. परिवहन महामंडळाने प्रवासी व कर्मचाऱ्यांसाठी नियमावली दिली आहे. या नियमावलीचा तंतोतंत पालन केल्यास होणारे छोटे मोठे अपघात टाळण्यास मदत होवू शकते. यासाठी सर्व कर्मचारी बांधवानी एकत्रीत येवून प्रयत्न केलेे पाहिजे.
यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, विना अपघात सुरक्षितता मोहिमेचे कर्मचाऱ्यांना बॅचेस वाटप व फलकाचे अनावरण करून उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मयूर तायडे यांनी तर आभार ए.पी. बुगले यांनी मानले.