क्राईम
लाॕकडाऊनच्या काळातील “हे” गुन्हे मागे घेणार-गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई – कोविड-19 च्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आयपीसी सेक्शन 188 अंतर्गत दाखल करण्यात आलेले गुन्हे राज्य सरकार नियमानुसार न्यायिक प्रक्रियेचे पालन करून मागे घेणार आहे.असे राज्याचे गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केलेले आहे.त्यामुळे लाॕकडाऊन काळात आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हे दाखल असलेल्या हजारो लोकांना दिलासा मिळणार आहे.