आरोग्य

लाॕकडाऊन झाल्यास ? त्यानंतर थकित विजबिले माफ होणार ?

मुंबई दि-29 राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ही कोरोनाची दुसरी लाट असण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविलेली आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मंत्रालयातील ,राज्यातील इतर सर्व प्रमुख विभागातील वरीष्ठ अधिकाऱ्यांशी तसेच टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांशी कोरोनाच्या वाढत्या प्रसारावर सखोल चर्चा करून कोरोनाला नियंत्रणात आणणे अवघड झाल्याने कोरोनाला रोखण्यासाठी शेवटी लाॕकडाऊनचा पर्याय अटळ असल्याचे संकेत दिलेले आहेत. या घोंगावणाऱ्या संभाव्य लाॕकडाऊनमुळे शेतकरी , हातमजूर, कामगार, लघुउद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आधीच मागील वर्षीच्या लाॕकडाऊन नंतरच्या कठिण परिस्थितीला तोंड देत कसेतरी सावरणारे आता पुन्हा एकदा चिंतेत पडलेले आहे.
मागील वर्षी लाॕकडाऊन व नंतरच्या परिस्थितीमुळे राज्यातील लाखो लोकांचा रोजगार बुडालेला होता. अशातच हजारो लोकांना महावितरण कंपनीच्या वाढीव वीजबिलांचा “शाॕक” बसलेला होता. त्यामुळे काही ग्राहकांनी कसे तरी तडजोड करून महावितरणने दिलेल्या सुलभ हप्त्यांच्या सवलतीमुळे टप्प्याटप्प्याने विजबिल भरलेले आहेत. तर अनेकांना अजूनही पूर्ण वर्षभराचे विजबील भरता आलेले नाही. त्यामुळे असे थकबाकीदार झालेले असून या ग्राहकांना वाढीव विजबिल आणि त्यावरील थकित व्याजाचा प्रचंड भुर्दंड बसून तो वाढतच चाललेला आहे. त्यामुळे आता महावितरण कंपनीने मोठ्या थकबाकीदार ग्राहकांचा विजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केलेली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या लाॕकडाऊन सदृश्य परिस्थिती असताना आणि बहुतेक घरांमध्ये संपूर्ण कुटुंब कोव्हिडचे रूग्ण आढळून येत असताना देखील त्या थकीत ग्राहकांचा विजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याची माहिती जनतेतून समोर येत आहे. यामुळे सामान्य जनतेत असंतोषाची भावना निर्माण होत आहे. मागील वर्षापासून अनेक राजकीय पक्ष व इतर सामाजिक संघटनांतर्फे वाढीव विजबिले माफ करण्यासंदर्भात राज्यभर अनेक आंदोलने झाली. मात्र अजूनही विजबिले माफ झालेली नाहीत किंबहुना त्यातील इतर आकाराचे दर आकारणी सुद्धा कमी करण्यात आलेली नाही.

महाराष्ट्र देशा !! लाॕकडाऊनच्या देशा !!

लाॕकडाऊन नंतर विजबिले माफ होणार का ?
अशातच पुन्हा लाॕकडाऊन लागल्यास सामान्य माणसाची क्रयशक्ती कमी होऊन आर्थिक घडी विस्कटून जाईल. परिणामी मोठ्या थकित रकमेचे विजबिल भरणे शक्यच होणार नाही. त्यामुळे हा औचित्याचा मुद्दा लक्षात आल्यास शासनाला नाईलाजाने का होईना लाॕकडाऊन नंतर थकित विजबिले माफ करावेच लागतील. महाराष्ट्राच्या शेजारील मध्यप्रदेश,कर्नाटक, राजस्थान तसेच पंजाब ,दिल्ली व तमिळनाडूने मागील वर्षीच विजबिले सरसकट माफ केलेली होती. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही विजबिले माफ होण्याची सामान्य जनतेला आशा आहे. अन्यथा जनक्षोभ असंतोषात रूपांतरीत होऊ शकतो.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.