राजकीय

लेवा समाजावरील स्पेलिंग तफावतीचा अन्याय दूर करा- खा.रक्षाताई खडसे


दिल्ली (वृत्तसंस्था)-महाराष्ट्र राज्याच्या जातींच्या सूचीमध्ये लेवा पाटीदार चे इंग्रजी भाषांतर LEVA PATIDAR असे नमूद केलेले आहे. तथापि, केंद्र सरकारच्या जातींच्या सूचीमध्ये Lewa patidar असे भाषांतर केलेले आहे.
परिणामी लेवा पाटीदार समाजातील विद्यार्थ्यांच्या जात पडताळणी दाखल्यांमध्ये Leva patidar असे स्पेलिंग असल्याने तो जेव्हा केंद्र सरकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशांसाठी अर्ज करतो त्यावेळेला V व W यामधील स्पेलिंग तफावतीमुळे सदर विद्यार्थ्याला OBC ऐवजी OPEN यादीमध्ये समाविष्ट केले जाते. यामुळे लेवा समाजाच्या तरुण मुलामुलींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंदर्भात केंद्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी खासदार रक्षाताई खडसे यांनी आज लोकसभेत केली.
महाराष्ट्र राज्यातील लेवा समाजाचे विद्यार्थी ओबीसी आरक्षणाचा फायदा घेऊन उच्च शिक्षणासाठी जसे इंजिनिअरिंग, मेडिकल, कायदा इत्यादी क्षेत्रासाठी केंद्रसरकार संचलित संस्थांमध्ये अर्ज करतात त्यावेळी Leva स्पेलिंगच्या जागी Lewa स्पेलिंग असल्याकारणाने ओबीसी आरक्षणापासून वंचित राहतात. माझ्या रावेर लोकसभा क्षेत्रामध्ये लेवा समाजाच्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
मागील दोन वर्षापासून या स्पेलिंगमध्ये बदल करण्यासाठी अनेक सामाजिक संस्थांमार्फत सामाजिक न्याय मंत्रालय व एनसीबीसी कमिशन मध्ये निवेदने दिली गेलेली आहेत. परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारची दुरुस्तीची कारवाई झालेली नाही. असे समजले आहे की एनसीबीसी कमिशनने हा स्पेलिंग करेक्शनचा विषय रोहिणी कमिशनकडे वर्ग केलेला आहे.
ज्याची मुदत सहा महिनेपर्यंत वाढवली गेली आहे. खासदार रक्षाताई खडसे यांनी सभागृहाच्या माध्यमातून सरकारला निवेदन केले आहे की इंग्लिश शब्द डब्ल्यू च्या जागी लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा आणि जोपर्यंत यामध्ये दुरुस्ती होत नाही तोपर्यंत दोन्ही शब्द लेवा आणि लेवा एकाच जातीचे आहेत म्हणून सर्व विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडे OBC सर्टिफिकेट आहेत अशांना ओबीसी आरक्षणाचा फायदा देण्याच्या सूचना सर्व केंद्रीय संस्थांना त्वरित देण्यात यावा त्यामुळे यावर्षी लेवा समाजाचा ओबीसी आरक्षणासाठी पात्र असलेला कोणताच विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.