आरोग्य

वरणगावात विवाहित महिलेची आत्महत्या

दि-28/08/2020 भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील मोठी होळी परिसरातील रहिवाशी असलेल्या 28 वर्षीय विवाहितेने गुरूवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने या परिसरात खळबळ उडालेली आहे. अपेक्षा वैभव देशमुख वय (28) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे.विवाहितेने आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे समजु शकलेले नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे की वरणगाव शहरातील मोठी होळी परिसरातील रहिवाशी असलेले वैभव यंशवतराव देशमुख यांच्या पत्नी अपेक्षा वैभव देशमुख (२८) या विवाहतीने गुरूवार रोजी आपल्या राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीतील छताला ओढणी बांधून गळ्याला गळफास लावून आत्महत्या केली. या बाबत मयत विवाहतीचे सासरे यंशवतराव शंकरराव देशमुख यांनी दिलेल्या खबरीवरून वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आलेली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.