क्राईम

वरणगाव नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा केला प्रयत्न

भुसावळ- तालुक्यातील वरणगाव नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा पगार सहा महिन्यापासून थकल्यामुळे आज कर्मचाऱ्यांनी एकत्र येत मुख्याधिकाऱ्यांसमोर अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच धावपळ उडाली जोपर्यंत कर्मचाऱ्यांचा पगार होणार नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलनाचा इशाराही कर्मचाऱ्यांनी आज दिला आहे.यामुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे. काही कर्मचारी मुख्याधिकार्‍यांना पगार कधी होणार असे विचारण्यासाठी गेले असता मुख्याधिकार्‍यांनी तुमचा पगार होणार नाही, अशी उत्तरे देतात कर्मचारी म्हणाले की आम्ही मरायचे का यावर मुख्याधिकार्‍यांनी होकार दिला म्हणून कर्मचाऱ्यांना अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.