राजकीय

वरणगाव येथील मंजूर पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करा- सुनिल काळे

वरणगाव -भाजपच्या वतीने वरणगाव येथे मंजूर २५ कोटीच्या २४/७ पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु करा तसेच वाढीव वीजबिले माफ करा या मागणीसाठी आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
मंजूर पाणी पुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरु न केल्यास जलसमाधी आंदोलन

दि-१३ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय जनता पार्टी च्या सरकार च्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस व माजी जलसंपदामंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या कडून नगराध्यक्ष सुनील काळे यांनी वरणगाव शहरातील नागरिकांना २४ तास पिण्याचे पाणी मिळावे यासाठी २५ कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर करुन आणली मात्र आजपर्यंत मंजूर योजनेचे काम सरकारच्या विकास विरोधी भुमिकेमुळे मुद्दामहून सुरु केलेले नाही त्यामुळे वरणगावातील नागरिकांना पिण्याचे पाणी ७ ते ८ दिवसाआड मिळते. नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते.आमची आपणास विनंती आहे की मंजूर पाणी पुरवठा योजनेची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असतांना सुद्धा प्रशासन मंजूर पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु करत नाही हा सरकार वरणगावकरांवर अन्याय करीत आहे.आम्ही आपणस विनंती करतो की मंजूर पाणी पुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरु करण्यासाठी तसेच तीर्थ क्षेत्र नागेश्वर महादेव मंदिराचे काम सुरु करा तसेच प्रलंबित विकास कामे सुरु करा व कोरोना काळात नागरिकांना अवाजावी वीजबिले आलेली आहे ती माफ करण्यात यावी या मागणी साठी भारतीय जनता पार्टी च्या वतीने आज २४ नोव्हेंबर मंगळवारी सकाळी १० वाजता वरणगाव बस स्थानक चौकात रस्ता रोको आंदोलन असंख्य हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित संपन्न झाले. यावेळी पाणी या ज्वलंत विषयवार पथनाट्य आयोजित केले होते यावेळी मान्यवरांची भाषणे झाली १५ दिवसाच्याच्या आत योजनेच्या कामाला सुरवात न झाल्यास जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.