वराडसीमला गावठी पिस्तुल जप्त ,दोघांना अटक

भुसावळ तालुक्यातील वराडसीम या छोट्याशा खेड्यात पाण्याच्या टाकीजवळ यावल तालुक्यातील पाडळसा गावातील एक इसम व भुसावळ तालुक्यातील वराडसीम गावातील एक इसम दोघे गैरकायदा विना परवाना गावठी पिस्तुल बाळगत असल्याची गुप्त माहिती भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळल्यावरून कर्मचाऱ्यांचे पथक सोबत घेऊन सापळा रचून वरील दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक ९ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी २.२० वाजेच्या सुमारास भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील वराडसीम गावी पाण्याच्या टाकीजवळ इसम नामे राजेश रमेश तायडे वय २७ वर्ष राहणार पाडळसे ह.मु.असोदा, सचिन संतोष सपकाळे वय २६ वर्ष राहणार वराडसीम यांच्या ताब्यात गैरकायदा विना पास परमिट शिवाय रू-१५,०००/ किंमतीची गावठी पिस्तुल मिळून आली म्हणून त्यांच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगणे कायदा ३/२५ मु.पो कायदा कलम ३७(१)(३) १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले,मा अप्पर पोलिस अधीक्षिका भाग्यश्री नवटके मॅडम, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,सपोनि रुपाली चव्हाण,पो.हे.कॉ.युनूस इब्राहिम, शेख युनूस,मुसा शेख, विठ्ठल फुसे,राजेंद्र पवार, संजय मोंढे, ईशान तडवी,होमगार्ड जगदीश पाटील यांनी केली आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरक्षक रामकृष्ण कुंभार हे करीत आहेत.