वळणावर अचानक ब्रेक दाबल्याने ट्रक पलटी, क्लिनर ठार

सावदा- बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर दिनांक ४ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास रावेर कडून सावदा मार्गे येणारा ट्रक गॅस गोडाऊन समोर पलटी झाल्याने या घटनेत ट्रक क्लिनर हा जागीच ठार झाला असून चालक गंभीर जखमी झालेला आहे. या अपघातात मालाचे व ट्रकचे मोठे नुकसान झाल्याने सावदा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की , रावेर कडून सावद्याकडे फ्रुटने भरलेला ट्रक क्रमांक जे.के.०८ एच.९७७६ चा चालक हा भरधाव वेगात येत असताना गॕस गोडाऊन समोरच वळणावरती जोरदार ब्रेक मारल्याने दिनांक ४ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास ट्रक अचानक पलटी झाल्याने या घटनेत ट्रक क्लिंनर मुन्ना उर्फ सोमराज रमेशचंद्र हा जागीच ठार झालेला आहे, तर चालक करण राजेश शर्मा हा जखमी झाला आहे .घटनेची माहिती मिळताच सावदा पोलिस ठाण्याचे स.पो.नि.इंगोले सह पोलिसांनी धाव घेतली आणि जखमींना प्रथमोउपचारासाठी पालिका रुग्णालयात दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सदरील ट्रक चालक हा स्वतःच्या
दुखापतीस तसेच मयत क्लिनर मुन्ना उर्फ सोमराज रमेशचंद्र शर्मा याचे मरणास व ट्रकच्या नुकसानीस कारणीभूत झाला असून यासंदर्भात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.