वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च टाळून वृक्षारोपणाचा आदर्श उपक्रम

भुसावळ- वाढदिवसा निमित्त वायफळ खर्च न करता पर्यावरणा रक्षणासाठी वृक्षारोपण करून त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेत सुनसगांव येथील दा.पां. पा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.पी.सपकाळे यांनी एक आदर्श आणि प्रेरणादाई उपक्रम समाजासमोर ठेवलेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुनसगाव ता.भुसावळ येथील दादासाहेब दामु पांडू पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.पी.सपकाळे यांनी २६ जानेवारीला वाढदिवसावर होणाऱ्या वायफळ खर्चाला आळा घालत वाढदिवसावर होणाऱ्या खर्चातून पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणाची संकल्पना राबवली.२६ जानेवारी निमित्त २६ झाडांची लागवड करून वर्षभर त्यांची काळजी घेत त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतली. त्यांनी या आदर्श उपक्रमाची प्रेरणा इतरांनी पण घ्यावी याचे आवाहन करून पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगीतले. तसेच शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाच्या हातुन एक वृक्ष लावून घेतले. तसेच पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावेळी चोपडा पंचायत समितीचे माजी सभापती डी.पी.साळूंखे, शिक्षक परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष एस.एस.अहिरे, माध्यमिक पतपेढीचे संचालक संजू भटकर, प्रशांत नरवाडे, इब्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.आर.धनगर, सर्वेदय हायस्कूलचे मुख्याध्यापक एस.एन.पाटील, भिका कोळी,आर.बी.पाटील, अनिल माळी, विकास विद्यालय सातोद ता. यावल येथील पर्यवेक्षक के.आर.सोनवणे, ग.स.सोसोयाटीचे माजी तज्ञ संचालक योगेश इंगळे, भुसावळ नुतन प्राथमिक पतपेढीचे संचालक प्रदिप सोनवणे, जीवन महाजन, विज्ञान संघटनेचे सचिव सुनिल वानखेडे आदि उपस्थित होते.