विदेशी दारूची अवैध वाहतूक,तब्बल 30 लाख 99 हजाराचा मुद्देमाल जप्त, पोलिसांची राज्यातील सर्वात मोठी कार्यवाही

वर्धा- दि- १५-०१-२०२१ रोजी सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन गिरड अंतर्गत पोलीस स्टाफसह नागपूर-चंद्रपूर रोडवर साखरा गावाजवळ
नाकाबंदी करण्यात आली.१६ जानेवारी शनिवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास गिरड कोरा मार्गाने एका आयशर ट्रकमध्ये नागपुरकडून चंद्रपूरकडे अवैध दारू वाहतूक होते असल्याची गुप्त माहिती ठाणेदार श्री महेंद्र सुर्यवंशी यांना मिळाली असता त्यांनी गिरड कोरा मार्गावरील साखरा शिवारात सापळा रचून गिरडकडून कोऱ्याकडे भरधाव वेगाने जात असलेल्या आयशर ट्रक क्रमांक सीजी-०४/एमटी-४६९४ ला थांबवून त्याची पाहणी केली असता या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी दारु आढळून आली. पोलीसांनी वाहन व वाहनात असलेले आरोपी १) अक्षय नानाजी पोटफोडे, रा. हिंगणघाट, २) कुंदन नामदेवराव खडसे, रा. हिंगणघाट, ३) जोयाफ खा युसूफ खा रा. हिंगणघाट या तिघांना ताब्यात घेतले. यावेळी वाहनांची सखोल तपासणी केली असता वाहनामध्ये हेवर्ड कंपनीची बियर ५०० मि.ली. चे ७५ बाक्स किंमत ३ लाख २४ हजार, रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्की कंपनीचे ७५० मि.ली. मध्ये ५ बॉक्स किमंत ६० हजार रुपये, रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्की कंपनीचे १८० मि.ली. चे ४० बॉक्स किंमत ४ लाख ८० हजार रुपये, ईम्परीअर ब्लू कंपनीचे १८० मि.ली चे ५ बॉक्स किमंत ४८ हजार रुपये, मॅकडावल कंपनीचे १८० मि.ली. चे ९० बॉक्स किंमत ८ लाख ६४ हजार रुपये, स्टरलींग कंपनीचे ५ बॉक्स किंमत १ लाख ८००/- रुपये एकुण किंमत १८ लाख ८४ हजार रुपये व आयशर ट्रक किंमत १२ लाख रुपये व तिन आरोपी जवळील १५ हजार रुपये किंमतीचे मोबाईल नगदी असा ३० लाख ९९ हजार रुपये असा माल जप्त करून दारूबंदी कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली.
सदर कार्यावाही मा.पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट श्री भीमराव टेळे यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक श्री महेंद्र
सूर्यवंशी पोलीस अंमलदार प्रमोद सोनोने, नरेंद्र बेलखेडे, रवि घाटुरले, राहुल मानकर, प्रशांत ठोंबरे, महेंद्र गिरी, रवि घाटुरले यांनी केली.