अमरावतीराजकीयविदर्भ

विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती मिळण्यासाठी प्रक्रिया अधिक गतिमान करणार – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती मिळण्यासाठी प्रक्रिया अधिक गतिमान करणार – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

अमरावती, दि. १९ : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण वेळेत व्हावे यासाठी शिष्यवृत्ती योजनेतील सर्व अडथळे दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे सांगितले.

शासकीय विश्रामभवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रारंभी केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी सामाजिक न्याय विभागाच्या अधिका-यांशी चर्चा करून विविध कामांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. प्रादेशिक समाजकल्याण उपायुक्त सुनील वारे उपस्थित होते. त्यानंतर श्री. आठवले यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधला.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा शिक्षणप्रक्रियेतील सहभाग वाढविणे, त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीत येत असलेले सर्व अडथळे दूर करण्यात येतील व ही प्रक्रिया अधिक गतिमान करण्यात येईल, अशी ग्वाही श्री. आठवले यांनी दिली.

आंतरजातीय विवाह योजनेच्या अनुदानाबाबतही गतीने कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

माजी नगरसेवक प्रकाश बनसोड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.