क्राईम

विद्युत खांबाचा शाॕक लागल्याने महिला व गायीचा जागीच मृत्यू

भुसावळ – तालुक्यातील जोगलखोरी गावाजवळ आज सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास कमलबाई सुरेश पाटील (वय 57) रा.जोगलखोरी ता. भुसावळ या त्यांच्या मालकीची गाय गुराखी चरण्यासाठी घेऊन जात असताना एक गाय प्रेमदास लढे यांचे गावाशेजारी असलेल्या शेतात पळत दिल्याने गाय हिने तिथे पिके खाऊ नये म्हणून त्या गायच्या मागोमाग पळत गेल्यानंतर त्यानंतर त्यावेळी गाय ही लढे यांच्या शेतातील इलेक्ट्रिकचे खांबाजवळ गेली असता, गायीचा खांबाला स्पर्श झाल्याने त्याचवेळी कमलबाई यांनी गायीला पकडताच त्या गायसह विद्युत प्रवाह सुरू असलेल्या खांबाला चिपकून जागेवरच मयत झालेल्या आहेत. ग्रामस्थांनी विजवितरण कार्यालयात फोन केला असता कोणीही फोन उचलत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. याबाबत प्रकाश परबत पाटील यांच्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.