कोर्ट निकालमुंबईराजकीय

विधानसभा अध्यक्षांनी ‘त्या’ आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी ‘त्या’ आमदारांच्या अपात्रतेबाबत अजून कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. आमदारांच्या अपात्रतेच्या बाबत व इतर याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र,आज ही प्रकरणे खंडपीठासमोर सुनावणीस न आल्याने शिवसेनेच्यावतीने सरन्यायाधीशांकडे या सुनावणीबाबत विनंती करण्यात आली. त्यानंतर सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना हे निर्देश दिले आहेत.यामुळे ‘त्या’ संबंधित आमदारांना पुढील सुनावणी पूर्ण होईपर्यंत दिलासा मिळाला आहे.

पुढील सुनावणीवर लक्ष


मागील महिन्यात झालेल्या तातडीच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा उपाध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेबाबत 11 जुलैपर्यंत कोणताही निर्णय न घेण्याचे निर्देश दिले होते. आज, शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात ठेवलेलं होत.सिब्बल न्यायालयासमोर म्हणाले की, उद्या अपात्रतेबाबतचा विषय विधानसभेत ऐकला जाईल. जर कोर्टानं आज सुनावणी घेतली नाही तर विधानसभा अध्यक्ष यावर निर्णय घेऊ शकतात. जोवर यावर कोर्ट सुनावणी करत नाही, तोवर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेऊ नये, अशी मागणी सिब्बल यांनी कोर्टाकडे केली. यावर कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना कोर्टाचा निर्णय येईस्तोवर कुठलाही निर्णय न घेण्याबाबत अध्यक्षांना निर्देश दिले.

हकालपट्टीचा विषय गंभीर


शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षात केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होऊन सत्तांतर घडलेलं आहे.त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. मात्र त्याआधी शिवसेनेने बंडखोर आमदारांवर कारवाईचा बडगा उगारणे सुरू केले होते. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करत अजय चौधरी यांची गटनेते पदी निवड केली. त्याला आव्हान देत शिंदे गटाने शिवसेनेच्या कारवाईच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर शिवसेनेच्यावतीनेही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.यामुळे ‘त्या’ संबंधित आमदारांना पुढील सुनावणी पूर्ण होईपर्यंत दिलासा मिळाला आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.