Crime

विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक यांच्या पथकाने गावठी कट्टा केला जप्त

जळगाव दि-११ : मा. विशेष पोलिस महानिरीक्षक परिक्षेत्र नाशिक यांचे विशेष पथक आणि फैजपूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत एका गावठी कट्टयासह एकास अटक करण्यात आलेली आहे. विशाल प्रकाश पाचपांडे (वय 23) रा.गंगाराम प्लॉट ,म्युनिसिपल हायस्कूल मागे भुसावळ असे अटक करण्यात आलेल्या कट्टा खरेदीदार आरोपीचे नाव आहे. पार उमर्टी ता.वरला जि.बडवाणी (मध्यप्रदेश) येथील शिकलकर नामक व्यक्तीकडून त्याने हा गावठी कट्टा विकत घेतलेला होता.
सदरील आरोपीकडून गावठी कट्टा किंमत 26 हजार रुपये मात्र आणि मोटरसायकल किंमत 30,000 मात्र असा एकूण 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत फैजपूर पोलिस स्टेशनला आर्म अँक्ट 3/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.या अटकेतील आरोपीस फैजपूर पोलिसांच्या ताब्यात पुढील कारवाईकामी देण्यात आलेले आहे.


सदरील कारवाई ही विशेष पथकातील पोलिस निरीक्षक बापू रोहम व त्यांचे सहकारी तसेच फैजपूर स.पो.नि.सिध्देश्वर आखेगांवकर, स.फौ.बशिर तडवी, रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने, राजेश ब-हाटे , किरण चाटे, चेतन महाजन, उमेश सानप यांच्या संयुक्त पथकाने केलेली आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.