क्राईम

विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्या पथकाची धुळ्यात 2 सट्टा पिढीवर धाड, अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ

धुळे – दिनांक 10फेब्रुवारी रोजी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र ,नाशिक यांच्या विशेष पथकाने धुळे शहरात धडाकेबाज कारवाई करत अवैधरित्या कल्याण सट्टा-मटका पिढी चालवणाऱ्यांवर 2 ठिकाणी धडाकेबाज कारवाई करत तब्बल एक लाख 21 हजार 430 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
या कारवाईमुळे धुळे शहरातील अवैध धंदे चालविणार्‍यामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. तसेच थेट मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने धुळ्यात येऊन कारवाई केल्याने स्थानिक पोलिस प्रशासनातही प्रचंड खळबळ उडालेली आहे.
यातील पहिली धाड ही धुळे शहरातील दादावाडी शैक्षणिक व सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे सट्टापेढी मालक गोविंद ज्योतीराम साखला आणि त्याचा व्यवस्थापक संतोष परदेशी यांचेवर टाकत त्यांच्याकडून घटनास्थळी 16 मोबाईल फोन अंदाजे किंमत 46 हजार पाचशे रुपये तसेच 72 हजार 930 रुपयांची रोकड असा एकूण एक लाख 21 हजार 430 रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळी जप्त करण्यात आलेला आहे.
तसेच दुसरी कारवाई ही पाच कंदील चौक ग.नं.2 शेरे पंजाब हॉटेल समोर चौधरी मार्केटचे जवळ करण्यात आलेली असून याठिकाणी आरोपी राकेश मोहनलाल अग्रवाल आणि संदीप अशोक मोहिते यांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आलेले असून त्यांच्याकडून एकूण मुद्देमाल 29,580 रूपये मात्र जप्त करण्यात आलेला आहे.
या सर्व आरोपींविरोधात धुळे शहर पोलीस स्टेशनला महाराष्ट्र जुगार अधिनियम कायदा कलम 12 (अ)अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले असून आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
सदरील कारवाईही मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलिस निरीक्षक बापू रोहम व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.