क्राईम

व्हाॕट्सॲप हॕकिंगद्वारे ब्लॕकमेलिंगचे प्रमाण वाढले

मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र सायबर सुरक्षा
विभागाने व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांना सावधगिरीचा इशारा दिलेला आहे. यात सायबर सेलने म्हटलेले आहे की, व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करून ब्लॅकमेल करण्याचा नवा धंदा हॅकर्सनी सुरू केल्याचे उघड झालेले आहे. एका विशिष्ट तंत्रज्ञानाच्या मदतीने व्हॉट्सअॅप युझरच्या अकाउंटचा अॅक्सेस मिळविल्यानंतर अकाउंटमध्ये घुसखोरी करून त्यावर नियंत्रण मिळवून हे सायबर क्रूक्स व्हाॕट्सॲप वापरकर्त्यांना त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील सदस्यांना किंवा युजरच्या व्हाॕट्सॲप गृपमध्ये आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ पाठविण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. तरी प्रत्येक व्हाॕट्सॲप वापरकर्त्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.असे महाराष्ट्र सायबर सेलने ट्विट केलेले आहे.
Show More

Related Articles

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.