कोर्ट निकालमुंबईराजकीय

व्हिपचं उल्लंघन प्रकरणी शिवसेनेच्या 53 आमदारांना विधिमंडळ सचिवालयाची नोटीस,अपवाद मात्र आदित्य ठाकरे

मुंबई : कथित ‘उठाव’ करून सत्तांतर घडवणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत उरलेले शिवसेना आमदार या सर्वांना विधिमंडळ सचिवांनी आज नोटीस बजावली आहे. दोन्ही गटांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या वेळी आणि बहुमत चाचणीवेळी व्हिपचं उल्लंघन केल्याचा परस्परविरोधी दावा केला होता आणि त्यासंदर्भात विधिमंडळ सचिवांकडे तक्रारी देखील केल्या होत्या. मात्र अपवाद फक्त आदित्य उद्धव ठाकरे यांचा आहे.एकनाथ शिंदे गटानं आदित्य ठाकरेंविरोधात तक्रार केली नव्हती, त्यामुळे त्यांना नोटीस पाठवण्यात आलेली नाही.
नोटीस पाठवण्यात आलेल्या आमदारांना सात दिवसांच्या आत विधिमंडळात उत्तर द्यावे लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.
11 जुलैला शिवसेनेचा ‘सुप्रीम’ फैसला
11 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात लागणाऱ्या निकालावर उद्धव ठाकरेंसोबत उरलेल्या शिवसेनेचं अस्तित्व आणि भविष्य अवलंबून असणार आहे. शिवसेनेतील अधिकृत गटनेतेपद व प्रतोदपदाची लढाई सुप्रीम कोर्टात होणार आहे. सोबतच 16 आमदारांच्या निलंबनासह एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या तक्रारीची याचिका देखील सुप्रीम कोर्टात असून त्यावरही सुनावणी होणार आहे.अतिशय गुंतागुंतीचं असलेल्या या प्रकरणांतील निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

हे पण वाचा : प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


सत्तांतरांनंतर बोलावलेल्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, दोन्ही गटांनी बहुमत चाचणी मतदानाचा एकमेकांचा व्हिप धुडकावून लावल्याचा परस्परविरोधी दावा तक्रारीत केला आहे. ठाकरेंसोबत उरलेल्या गटाच्या व्हिपचं उल्लंघन झाल्याचं तत्कालीन पीठासीन अधिकार नरहरी झिरवळ यांनी रेकॉर्डवर घेतलं. तर त्यानंतर काही तासांत, नवे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदे गटाच्या व्हिपचं उल्लंघन झाल्याचं रेकॉर्डवर घेतलं. त्याआधारे विधिमंडळ सचिवांनी घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य याच प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात 11 जुलै रोजी खल होणार आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.