शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात रूग्णाची आत्महत्या

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड सेंटर मध्ये कोविड संशयित रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडल्याने मोठी खळबळ उडालेली आहे. कडूबा नकुल घोंगडे असे या मयत रुग्णाचे नाव असून तो रा.पहुर पेठ ता.जामनेर येथील रहिवासी होता . कोरोनाच्या भीतीने आलेल्या नैराश्यातून त्याने ही आत्महत्या केल्याच सांगण्यात येत आहे, कोरोनाची लक्षणे दिसून येत असल्याने त्याला परवा रात्री पहुर ग्रामीण रुग्णलयातून जळगाव येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते,त्याचा कालच स्वॕब घेण्यात आला होता,त्याचा अहवाल येण्या पूर्वीच गळ्यातील मफलर च्या साहाय्याने त्याने ही आत्महत्या केलेली आहे, वॉर्ड क्रमांक सहाच्या जवळच असलेल्या लोखंडी बारला त्याने लटकावून घेतल्याचे सूत्रांच्या कडून सांगण्यात येत आहे.
परवा रात्री दाखल केल्या पासूनच कडूबा अतिशय तणावात होता,काल रात्रीही त्याने परिचरिकाना जेवण घेण्यास नकार दिल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून समोर आलेली आहे.