ठाणेनिवडणूकमुंबईराजकीय

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे “ते” पत्र आता पुन्हा चर्चेत, शिवसेनेतील असंतोषाची सुरुवात सरनाईकांपासून झाली का ?

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे “ते” पत्र आता पुन्हा चर्चेत, शिवसेनेतील असंतोषाची सुरुवात सरनाईकांपासून झाली का ?

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मागील वर्षी एक पत्र लिहिलेलं होत.या पत्रात सरनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी शिवसेनेने पुन्हा जुळवून घ्यावे असं मत व्यक्त केलेलं होत.या पत्रात प्रताप सरनाईक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर काही आरोपही केले होते.

सरनाईक त्यांच्या पत्रात म्हणाले होते की, “कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, असं भासवण्याचा प्रयत्न केला जातोय. शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही राष्ट्रवादी, काँग्रेसच्या आमदारांची कामं होत आहेत.राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.आपला पक्ष जर कोणी कमकुवत करत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे असे माझे वैयक्तिक मत आहे. यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांकडून दिला जाणारा नाहक त्रास थांबेल”.असे मत शिवसेनेचे फायनान्सर” नेते अशी ओळख असलेले आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले होते.आता शिवसेनेचे काही आमदारांसह प्रताप सरनाईकही अज्ञातस्थळी रवाना झाल्याने प्रताप सरनाईक यांच्या त्या मागील वर्षीच्या पत्राची आठवण ताजी झालेली असून पत्रावर विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत.तेव्हापासून तर शिवसेनेच्या आमदारांमध्ये असंतोष खदखदत नसेल ना ?अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत.

तेव्हाच प्रताप सरनाईक यांच्या “त्या” पत्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सखोल विचार करून निर्णय घेतला असता तर आज शिवसेनेच्या आमदारांनी बंड केलेले नसते .अशी चर्चा आता शिवसैनिकांमध्ये सुरू आहे.
तपास यंत्रणांचा ससेमिरा
मागील वर्षी पासून’टॉप्स सिक्युरिटी’ गैरव्यवहार प्रकरणी प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांची ईडीकडून चौकशी सुरू आहे.मागील वर्षी 24 नोव्हेंबर 2020 ला प्रताप सरनाईक यांचं घरं, कार्यालय, हॉटेल्स या विविध ठिकाणी छापे मारले होते. त्यानंतर पुत्र विहंग सरनाईक, पूर्वेश सरनाईक आणि स्वतः प्रताप सरनाईक यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. ईडीकडून सरनाईक यांच्या विविध मालमत्तेवर छापे टाकण्यांत आलेले होते.आता संध्याकाळीच प्रचंड राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.