मुंबईराजकीय

शिवसेना खा.संजय राऊत यांचे आमदार बंधू “नॉट रिचेबल” ? संजय राऊतांना मोठा हादरा

शिवसेना खा.संजय राऊत यांचे आमदार बंधू “नॉट रिचेबल” ? संजय राऊतांना मोठा हादरा

Eknath shinde | एकनाथ शिंदेच्या समर्थक 45 पेक्षा जास्त आमदारांनी बंड पुकारल्यामुळे मविआ सरकार संकटात सापडलेलं आहे. या बंडात सुरुवातीला 20 ते 25 आमदार होते. त्यानंतर हळूहळू इतर आमदार शिंदे यांच्या गोटात जावून मिळाले. शिंदे समर्थक आमदारांचा गट हा आसामच्या गुवाहाटी येथील रेडिसन हॉटेलमध्ये सध्या मुक्कामी आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील अनेक दिग्गज नेते या बंडात सहभागी झालेले आहेत. या बंडाचं ज्यांनी नेतृत्व केले ते एकनाथ शिंदे हे ठाकरेंचे खूप जवळचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यामुळे त्यांनी विविध मुद्दयांवरून बंड पुकारल्यामुळे देशभरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.काही वेळा पूर्वी विशेष म्हणजे आणखी धक्काकारक बातमी समोर आलेली आहे. बंडखोर आमदारांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत वारंवार आक्रमक भाषेत निशाणा साधतांना दिसत आहेत. पण त्यांचे सख्खे भाऊ आमदार सुनील राऊत हे नॉट रिचेबल झालेले असून त्यांचा दुपारी 12 वाजेपासून संपर्क होत नसल्याची माहिती आहे.ते एकनाथ शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडालेली आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आज ते थेट शिंदे गटात सहभागी होणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्यातून त्यांना मनातील धुसफूस दाखवून द्यायची आहे का ? असा प्रश्न उपस्थित होतोय. विशेष म्हणजे संजय राऊत हे बंडखोर गुवाहाटीतील 50 आमदारांवर आक्रमकपणे सडकून टीका करत आहेत. त्यांनीं काल 40 डुकरे गुवाहाटीत असल्याची टिका केली होती. शिंदे समर्थकांवर राऊत प्रचंड हल्लाबोल करत आहेत. असं असताना त्यांचा सख्खा लहान बंधु “नॉट रिचेबल” झाल्याने संजय राऊतांना मोठा हादरा बसलेला आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.