राजकीय
शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्या पत्नीला “ईडी”ची नोटीस ?

मुंबई -अलीकडेच राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना “ईडी”ची नोटीस येण्याच प्रकरण ताजे असतानाच आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा सावंत यांना सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) ची नोटीस आल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडालेली आहे.पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेच्या संदर्भात वर्षा सावंत यांच्या खात्यात 50 लाखांचे संशयास्पद व्यवहार झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस पाठवलेली असून 29 तारखेला त्यांना “ईडी”च्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती मिळालेली आहे. मात्र “ईडी” ची अशी कोणतीही नोटीस मिळाली नसल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिलेली असून नोटीस मिळाल्यावर पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरण देऊ असे खा.संजय राऊत यांनी स्पष्ट केलेले आहे.