
शिवसेना नेते गुलाबराव पाटील नॉटरिचेबल ? गुवाहाटीकडे रवाना झाल्याची चर्चा
मुंबई-जळगावचे पालकमंत्री आणि शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे नेते गुलाबराव पाटील हे आज सकाळीच आसामची राजधानी गुवाहटी कडे रवाना झाल्याची चर्चा सुरू झालेली आहे.आज सकाळी 9 वाजेपासून त्यांचा फोन नॉट रिचेबल येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ते आसाम मधील एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर आमदारांच्या गटाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप देऊन गेलेले आहेत ? की शिंदे यांच्या बंडखोर गटात औपचारिक रित्या सहभागी होण्यासाठी गेलेले आहेत ? याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही. मात्र शिवसेनेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळपासूनच गुलाबराव पाटील हे काहीतरी विशेष दौऱ्यासाठी निघाल्याची माहिती समोर आलेली आहे.जळगाव जिल्ह्यातील किशोर पाटील, चिमणराव पाटील आणि लता सोनवणे हे तिन आमदार आधीच एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर आमदारांच्या गटात सहभागी झालेले आहेत.