शिवसेना पक्षविस्तार आणि संघटनात्मक बांधणीला गती द्या- संपर्कप्रमुख विलासजी पारकर

भुसावळ -सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून पक्ष विस्तार आणि संघटनात्मक बांधणीच्या कामाला गती द्या, यापुढे पदाधिकाऱ्यांची निष्क्रियता अजिबात खपवून घेतली जाणार नाही शिवसेनेला जास्तीत जास्त यश मिळवण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागा असे प्रतिपादन रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विलास जी पारकर यांनी भुसावळ येथे संपन्न झालेल्या बैठकीत केले याप्रसंगी उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील, उपजिल्हाप्रमुख प्राध्यापक उत्तम सुरवाडे, उपजिल्हाप्रमुख ॲड.श्याम श्रीगोंदेकर तालुकाप्रमुख समाधान महाजन विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे तालुका संघटक प्राध्यापक धीरज पाटील ॲड श्री मनोहर खैरनार उत्तर विभाग शहर प्रमुख निलेश महाजन, दक्षिण शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे अल्पसंख्याक आघाडीचे उपजिल्हा संघटक सहित मुल्ला,उपतालुका सुभाष चौधरी,विजय सुरवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
संपर्कप्रमुख विलास जी पारकर यांनी भुसावळ तालुक्यातील 26 गावात संपन्न होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पक्षाच्या कामाचा आढावा या प्रसंगी घेतला पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यासमवेत मुंबई येथे संपन्न झालेल्या बैठकीतील लेखाजोखा याप्रसंगी मांडला स्थानिक पदाधिकाऱ्यांना पक्षीय पातळीवरील आवश्यक ते सर्व प्रकारचे पाठबळ मिळेल असे आश्वस्त केले.या बैठकीला रेल कामगार सेनेचे ललित मुथा,हेमंत खंबायत, ॲड. श्री लोखंडे,माजी नगरसेवक दीपक धांडे,देवेंद्र पाटील,निलेश ठाकूर,किशोर कोळी,निलेश सुरडकर,जितेंद्र नागपुरे,प्रकाश कोळी,भैया देशमुख,सुरेंद्र सोनवणे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्राध्यापक उत्तम सुरवाडे यांनी केले.