मुंबईराजकीय
Trending

शिवसेनेचे 7 खासदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात, चार खासदारांनी आज भेट घेतल्याची सूत्रांची माहिती

मुंबई : गेल्या राज्यसभेच्या निवडणुकीपासून शिवसेनेला अनेक मोठमोठे धक्के बसत आलेले असून, राज्यसभेत संजय पवार यांचा झालेला धक्कादायक पराभव आणि त्यानंतर विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर फुटलेल्या 39 आमदारांमुळे झालेले सत्तांतर अगदी ताजे असतानाच शिवसेनेसाठी आणखी एक मोठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. शिवसेनेतील तब्बल सात खासदार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असून यापैकी आज चार खासदारांनी मुंबईत फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे.

हे पण वाचा : देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा बॅनर वरून भाजपचे अमित शहा गायब, फडणवीस अमित शाहांवर नाराज आहेत का ?

Advertisement by sponsered

यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यासह चार खासदारांनी ही भेट घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. यातील दोन खासदारांना ईडीच्या कारवाईने पछाडलेले असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे.

हे पण वाचा : एकनाथ खडसेंच्या नावाची चर्चा, राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता ?

त्यामुळे येत्या काही दिवसात हे अस्वस्थ आणि नाराज असलेले खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होऊन त्यातील दोन ते तीन खासदारांना केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आता ते खासदार नेमके कोण याबाबत चर्चांना उधाण आलेलं असून येणाऱ्या काही दिवसात तशी खासदारांची फाटाफूट झाल्यास याबाबत आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.