
शिवसैनिक बंडखोर आमदारांचा राजभवनाचा रस्ता अडविण्याची शक्यता ? तर… सत्तास्थापनेचा मार्ग “महा”कठीण
मुंबई विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे गटाचे 40 बंडखोर आमदार हे हिंदुत्ववाच्या मुद्दयावरून भाजपसह सत्ता स्थापनेसाठी आग्रही असल्यामुळे राज्यात सत्तांतराचे वारे वाहू लागलेले असून महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आल्याची चिन्हे आता स्पष्टपणे दिसू लागलेली आहेत. आज किंवा उद्या मध्ये भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे सत्तास्थापनेसाठी दावा करू शकतात. त्यासाठी ते राजभवन येथे जाऊन राज्यपालांना निवेदन देऊन बहुमतासह सत्तास्थापनेचा दावा करू शकतात. राज्यपालांनी त्यांची मागणी मान्य केल्यास त्यांना सत्ता स्थापनेसाठी बहुमतासाठी लागणाऱ्या 145 आमदारांच्या संख्याबळाची संख्या सिद्ध करण्यासाठी सर्व पाठिंबा देणाऱ्या आमदारांना राजभवनात आणावे लागणार आहे. त्या आमदारांमध्ये शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे आपल्या 40 बंडखोर आमदारांसह जेव्हा राजभवन किंवा विधान भवन येथे बहुमत सिद्ध करण्यासाठी येतील तेव्हा त्यांच्या बसेस किंवा गाड्या या रस्त्यातच रोखण्याचा प्रयत्न शिवसैनिक करणार असल्याची माहिती समोर आल्याने सत्तास्थापनेचा मार्ग भाजप व शिवसेनेच्या बंडखोर आमदारांपुढे “महाकठीण” होणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळेत पोहोचणे या आमदारांसाठी फार महत्त्वाचे असणार आहे.त्यामुळे येणाऱ्या एक-दोन दिवसात याबाबत प्रचंड राजकीय उलथा पालथ होऊन राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
याला दुसरा “दैवी” पर्याय काय ? तर…
सत्तास्थापनेसाठी आवश्यक असणारे बहुमत सिद्ध करण्यासाठी जाणाऱ्या आमदारांच्या ताफ्याला शिवसैनिक रोखण्याची शक्यता गृहीत धरल्यास त्यांच्याशी संघर्ष टाळण्यासाठी फक्त एकच “दैवी” पर्याय उरतो तो म्हणजे राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची तब्येत खराब झाल्यास त्यांच्या राज्यपाल पदाचा कारभार शेजारील गोव्याचे राज्यपाल श्रीवर्धन यांच्याकडे दिला जाऊ शकतो.त्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा व बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे बंडखोर गटाला गोव्याला राजभवनात जावे लागेल. त्या ठिकाणी त्यांचा मार्ग सुलभ आणि सुकर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मात्र हा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या तब्येतीवर अवलंबून असलेला जर तरचा खरा प्रश्न आहे. शिवसैनिकांनी या आमदारांचा रास्तारोखो केल्यास यामुळें सत्तेच्या सारीपाटाचा खेळ लांबणार असल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे.