अर्थचक्र

शेअर बाजार प्रचंड कोसळला; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्सचा गुंतवणूकदारांना मोठा झटका

मुंबई दि-18 चार दिवसांच्या विश्रांतीनंतर आज खुल्या झालेल्या भांडवली बाजारात सकाळच्या सत्रात मोठी घसरण झालेली आहे.चीनमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेने प्रचंड थैमान घातलेले असून त्याचे पडसाद जगभरातील शेअर बाजारात उमटले आहेत.
चीनमध्ये करोनाच्या चौथ्या लाटेने थैमान घातले असून त्याचे पडसाद जगभरात उमटले आहेत. चीनमधील शाघांई,शेंझेन तसेच हाँगकाँग येथे कोरोना रुग्णांची संख्येत रोज प्रचंड वाढ होत असून तेथे लाॅकडाऊन आणखी तीव्र करण्यात येऊन वाढविण्यासात आला आहे.चीनमध्ये सर्वच प्रमुख अर्थव्यवस्था बंद असल्यामुळे त्यांचे जगभर पडसाद उमटत आहे.कोरोनाची चौथी लाट तीव्र झाल्यास आशिया खंडातील अर्थव्यवस्था पुन्हा संकटात सापडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आधीच पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळसारखे देश कर्जबाजारी होऊन दिवाळखोरीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
दरम्यान, मागील आठवड्यात 14 एप्रिलला महावीर जयंती आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 15 एप्रिल रोजी गुड फ्रायडे आणि त्याला लागून शनिवार आणि रविवार असे सलग चार दिवस भांडवली बाजार, कमाॅडिटी बाजार बंद होते. त्याआधी बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात शेअर निर्देशांकात घसरण झाली होती. सेन्सेक्स 237 अंकांच्या घसरणीसह 58338.93 अंकांवर स्थिरावलेला आहे. सेन्सक्स मिडकॅप निर्देशांक देखील 52 अंकांची घसरण झाली. तो 24985.25२ अंकांवर बंद झाला. आठवडाभराचा विचार केला तर तीन सत्रात सेन्सेक्समध्ये 1108 अंकांची घसरण झाली. निफ्टी 308 अंकांनी कोसळला. यामुळे गुंतवणूकदारांचे किमान 3 लाख कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.