संजू भटकर सर राष्ट्रीय समाज गौरव पुरस्काराने सन्मानित
भुसावळ : केंद्रीय मानवाधिकार संघटना, नवी दिल्लीच्या वतीने दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस 10 डिसेंबर रोजी नागपूर येथे राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात येते. याप्रसंगी देशातील विविध ठिकाणी सामाजिक कार्यात भरीव कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात येते. यावेळी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संजु भटकर यांना केंद्रिय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मिलिंद दहिवले व राष्ट्रीय संघटन सचिव शिवचरण उज्जैनकर यांच्या हस्ते राष्ट्रीय समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी त्यांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र, देऊन भटकर सर यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी जळगाव जिल्हा सचिव राजेश पोतदार व भुसावळ तालुका कार्याध्यक्ष राजेश सैनी यांना सुद्धा गौरवण्यात आलेले आहे.
संघटनेतर्फे दरवर्षी हा कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंदजी दहिवले यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा आश्रमामध्ये घेण्यात येत असतो. याप्रसंगी संघटनेचे महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश, गोवा, राजस्थान अशा विविध राज्यातील केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी वाहतूक पर्यवेक्षक महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळ नागपूरचे अरुण जमदाडे , एस.एस.कुमरे , नागपूरच्या गणेश पेठ पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक मदन मैराल, नागपूर स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी महासंचालक रामकृष्ण छांगाणी, अजय पात्रे, अनिस जैन, राष्ट्रीय प्रचार सचिव केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली, तथा लातूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अनिल कोकणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.