राज्य-देश
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा स्थापित

न्यूयॉर्क, अमेरिका:- भारताने आठव्या वेळी संयुक्त राष्ट्र संघटनेचे सदस्यत्व स्विकारल्यामुळे भारतीय राष्ट्रीय ध्वज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) स्थापित केला गेलेला आहे.
आज आठव्या वेळी भारताने सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व स्विकारल्यामुळे, आजचा ध्वज प्रतिष्ठापन समारंभात भाग घेण्याचा भारताचा कायमस्वरुपी प्रतिनिधी म्हणून माझ्यासाठी सन्मान आहे.आणि तसेच आजचा दिवस समस्त भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.अशी प्रतिक्रिया या ध्वज समारंभात संयुक्त राष्ट्र संघाचे भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी असणारे टीएनएस तिरुमूर्ती यांनी दिलेली आहे.