Crime

सलग दुसऱ्या दिवशी नाशिक पोलिस ACB च्या जाळ्यात,आज महिला अधिकारी जाळ्यात

नाशिक – काल आडगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कॉन्स्टेबल राजेश थेटे यांना 20 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या लाच प्रकरणाला चोवीस तास उलटत नाही तोच भद्रकाली पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रणिता पवार या अधिकारी आणि पोलीस नाईक तुषार बैरागी या दोघांनाही आज एका बलात्काराच्या गुन्ह्यात चार्जशीट लवकर दाखल करण्यासाठी 20 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे.
पोलिस उपअधीक्षक वैशाली पाटील यांनी पोलिस अधीक्षक सुनील कडासने व अपर पोलिस अधीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. त्यात राजेंद्र गिते, शरद हेंबाडे, अजय गरूड, प्रकाश महाजन यांनी ही कारवाई यशस्वी केली.
एकीकडे गृह विभाग ‘खाकीची दुसरीकडे नाशिक शहर पोलीस दलातील कर्मचारी, अधिकारी खाकीला काळिमा फासणारी कृत्ये करत असल्याची बाब आता उघड झालेली आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यात एकाचवेळी अधिकारी, कर्मचारी लाच घेताना पकडले गेले असल्याने आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांची काल पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी तडकाफडकी बदली केलेली आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.