वृत्तविशेष

सशक्त, महान राज्यघटनेच्या पाठबळावरच राज्याची विकासाची वाटचाल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा

मुंबई, दि. १३ : – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सशक्त, महान अशा राज्यघटनेच्या पाठबळावरच आपल्या राज्याची विकासाची वाटचाल सुरु आहे, अशी कृतज्ञता व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती दिनाच्या पुर्वसंध्येला राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, डॉ. आंबेडकर यांनी आपल्याला जगातील सर्वोत्तम अशी राज्यघटना दिली आहे. या सशक्त राज्यघटनेच्या माध्यमातूनच आपण प्रजासत्ताक आणि बलशाली राष्ट्र म्हणून वाटचाल करत आहोत. विविधतेने नटलेल्या आपल्या देशाला राज्यघटनेच्या एका सुत्रात गुंफून एकसंघ ठेवण्याची किमया डॉ. बाबासाहेबांनी केली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना डॉ. आंबेडकर यांच्या या योगदानासाठी आपल्याला कृतज्ञच राहावे लागेल. डॉ. बाबासाहेबांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आपल्याला राज्य आणि देशाबद्दलची बांधिलकी जाणीवपूर्वक जपावी लागेल. डॉ. आंबेडकर यांच्या समता-बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता या सुत्रांविषयी जागरूक राहावे लागेल, हेच त्यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन आणि या जयंती दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.