केंद्रीय योजना

‘सहकार मंत्रालया’ची निर्मिती, सहकारातून समृद्धीचे व्हिजन साकार करण्यासाठी केंद्राकडून महत्त्वपूर्ण पाऊल

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार 7 जुलै बुधवारी रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी केंद्र सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. सहकारातून समृद्धीचे आपले व्हिजन गाठण्यासाठी केंद्र सरकारने सहकार मंत्रालयाची निर्मिती केली आहे. तशी घोषणाच आज केंद्र सरकारकडून करण्यात आल्याचं वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिलेले आहे.
सहकारातून समृद्धीचं आपले व्हिजन साकार करण्यासाठी केंद्र सरकारने सहकार मंत्रालयाची निर्मिती केली आहे. हे मंत्रालय देशात सहकार क्षेत्राला मजबूत करण्यासाठी प्रशासकीय, कायदेशीर आणि धोरणात्मक पाया उपलब्ध करण्यासाठी काम करेल, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलेल आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या सायंकाळी होणार असल्याच्या धर्तीवर केंद्र सरकारकडून नव्या मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या मंत्रालयाची जबाबदारी महाराष्ट्र किंवा उत्तर प्रदेशातील खासदाराच्या खांद्यावर दिली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे.
source ANI

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.