क्राईम

सहाय्यक पोलिस निरीक्षकाला 15 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

जळगाव – सरकारी कर्मचाऱ्यांना भरघोस पगार असल्यावरही कोणतेही काम करण्याकरीता पैसे द्यावे लागतात. त्याशिवाय सामान्य माणसाचे काम होणारच नाही असे सध्याचे चित्र झालेले आहे. काल बोदवड येथील तहसीलदार ,मंडळ अधिकारी , तलाठी अशा तिघांना दोन लाखांची लाच भोवली, आणि तिघांची विकेट पडली होती. आणि आज जळगाव येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप हजारेला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या नाशिक येथील पथकाने लाच स्विकारताना रंगेहाथ पकडल्याने जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडालेली आहे. आज चक्क सहाय्यक पोलीस निरीक्षकच यात अडकल्याने प्रचंड खळबळ उडालेली आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संदिप हजारे यांना एका गुन्ह्यासंदर्भात तडजोडी अखेर पंधरा हजार रुपयांची लाच घेतांना नाशिक एसीबीच्या पथकाने आज शनिवार 19 डिसेंबर रोजी दुपारी रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे जिल्हा पोलिस दलात मोठी खळबळ उडालेली आहे. नाशिक एसीबीचे पोलिस निरीक्षक उज्वल पाटील, पो. नि. किरण रासकर यांच्या नेतृत्वाखाली सदरची कारवाई पूर्ण करण्यात आलेली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.