पुणेवृत्तविशेषशैक्षणिक विशेष

सामाजिक न्यायच्या ७७ निवासी शाळांचा निकाल १०० टक्के; सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन

सामाजिक न्यायच्या ७७ निवासी शाळांचा निकाल १०० टक्के; सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन

पुणे, –  राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती मुलां व मुलींच्या शासकीय निवासी शाळेमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी दहावी मध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. राज्यात कार्यरत असलेल्या एकूण 90 चे निवासी पैकी 77 निवासी शाळांचा निकाल हा 100% लागला आहे. विद्यार्थ्यांच्या लक्षणीय कामगिरीबद्दल समाजातील सर्वच घटक आतून विभागाचे कौतुक करण्यात येत आहे.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील निवासी शाळेतून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

त्याचबरोबर या सर्व शाळांमधून 90 टक्क्यांपेक्षा अधिक मार्क (गुण) मिळवणारे 119 विद्यार्थी आहेत हे विशेष.

90 निवासी शाळांपैकी 77 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे, 6 शाळांचा निकाल 95 टक्के लागला आहे, तर 4 निवासी शाळांचा निकाल 90 टक्के लागला आहे.

राज्यातील सर्व निवासी शाळा यांचा या कामगिरीबद्दल सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, सचिव सुमंत भांगे, आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना बरोबरच सर्व शाळांचे मुख्याध्यापक, कर्मचारी, शिक्षक यांचे देखील अभिनंदन केले आहे.

“राज्यातील अनुसूचित जातीच्या मुला-मुलींच्या इयत्ता दहावीतील लक्षणीय यशाबद्दल विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन, येणाऱ्या काळात देखील गुणवत्ता वाढीसाठी अधिक प्रयत्न विभागाच्या वतीने करण्यात येणार असून लवकरच या निवासी शाळांमध्ये सीबीएससी अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे” – समाज कल्याण विभाग आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.