सुप्रीम कोर्टाचे “हे” मुख्य न्यायाधीश आधी होते चित्रपट अभिनेते,माधुरी दिक्षीत,दिलीप कुमार,संजय दत्त सह केलय काम
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्याबद्दलची थोडीशी ज्ञात मनोरंजक गोष्ट आज त्यांच्या निरोप समारंभात उघड झाली ती अशी की, त्यांनी काही वर्षांपूर्वी हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. “त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये दबंग पोलीस निरीक्षक म्हणून काम केलेलं आहे. त्यांनी माधुरी दिक्षीत, दिलीप कुमार, कादर खान आणि संजय दत्त यांच्यासोबत “कानून अपना अपना” या चित्रपटात काम केले आहे,” असे सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ज्येष्ठ वकील प्रदीप राय यांनी आज त्यांच्या निरोप समारंभाच्या वेळी सांगितले.1989 साली ‘कानून अपना अपना’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
“न्यायमूर्ती राव हे त्यांच्या तरुण वयात एक चित्रपट अभिनेते होते. हे मला आत्ताच आताच कळालं”, असे भारताचे ऍटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.
तसेच सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष ज्येष्ठ वकील विकास सिंग यांनीही न्यायमूर्ती राव यांच्या अभिनय कौशल्याबद्दल भाष्य केले. सिंग म्हणाले की, “त्यांनी चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि त्याचे वैविध्यपूर्ण व्यक्तिमत्त्व आहे हे आता गुपित राहिलेले नाही. अभिनय करणे हे खूप अवघड काम आहे आणि जर त्यांनी केले असेल तर, ते किती अष्टपैलू आहेत याची महती कळते.