सेंट्रल बँकेने शेतकऱ्यांची होल्ड खाती तात्काळ सुरळीत करावी- खा.रक्षाताई खडसे

रावेर- रावेर तालुक्यातील चिनावल येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या शाखेत अनेक शेतकऱ्यांचे केळी पीक विमा योजना अनुषंगाने विनाकारण बँक खाते गेल्या महिनाभरापासून होल्ड करण्यात आली होती , यामुळे चिनावल, कुंभारखेडा , गौरखेडा, लोहारा, वडगाव सह यापरिसरातील शेतकरी ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर, गहू हरभरा पेरणीच्या तोंडावर स्थानिक बॅक प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे त्रस्त झाले होते ,
याविषयीची माहिती, सह विनंती या शेतकऱ्यांनी विलास ताठे यांच्या कडे केली, आम्हांला गहू हरभरा पेरणी करण्याची आहे, बाजारातून बियाणे,खते, फवारणी घ्यायची आहे, तसेच मजूरीसाठी आर्थिक बाबींची गरज असून, दिवाळीच्या मुहूर्तावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चिनावल येथून जवळपास महिनाभरापासून आमचे बँक खाते होल्ड करण्यात आली आहेत, यामुळे आम्ही शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत, तरी बँक कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत, या बाबींचा संवेदनशीलता कर्तव्य तत्परतेने आज श्री विलास ताठे कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चिनावल गाठलं आणि बँक कर्मचारी व अधिकारी यांना जाब विचारला, त्यांनी लगेच एक खाते कुंभारखेडा येथील शेतकऱ्यांचे खातं रिलीज केलं आणि लगेच तया शेतकऱ्यांने महिन्याभरात आपल्या खात्यातील रक्कम काढून समाधान व्यक्त केले,
याविषयीची सविस्तर माहिती श्री विलास ताठे कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी यांनी खाली फुंटसेल सोसायटी चिनावल याठिकाणी आयोजित केळी पीक विमा निकष बदलण्यासाठी आयोजित बैठकीत खासदार रक्षा खडसे यांच्या बैठकीत विलास ताठे यांनी मुद्दा उपस्थित करून,चिनावल शाखेत शेतकऱ्यांची कशी पिळवणूक होत आहे, याकडे जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई प्रल्हाद पाटील ,जि. प. उपाध्यक्ष नंदू महाजन, सुरेश धनके, पद्माकर महाजन, रावेर कुषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीकांत महाजन, रावेर पंचायत समिती सभापती जितु पाटील याचं लक्ष वेधूलं त्याच वेळी खासदार रक्षा खडसे यांनी क्षणाचाही विलंब न करता, त्वरित बँक मॅनेजर यांच्याशी संपर्क सदर सत्यता पडताळून पाहिली, आणि खासदार रक्षा खडसे यांनी तात्काळ संबंधित अधिकारी यांना आदेश दिले की, तुम्हाला कोणतेही रितसर परवानगी नसताना, तुम्ही या परिसरातील शेतकरी यांची खाती का होल्ड केली, तसेच ती होल्ड खाती तात्काळ सुरळीत करा, यापुढे खबरदारी घ्यावी,अशा सुचना केल्या, यावेळी चिनावल संरपच भावना बोरोले, गोपाळ नेमाडे, मिलिंद वायकोळे, तसेच कुंभारखेडा येथील शेतकऱी युवराज पाटील, मनोहर पाटील, भरत बोंडे, कोचूर माजी सरपंच रविंद्र महाजन, यांच्या सह अनेक शेतकरी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.