आरोग्य

स्टेट बँक आॕफ इंडियाच्या(SBI) मान्यताप्राप्त शाखांमध्ये निवडणूक रोखे 2018 ची विक्री

नवीदिल्ली दि-1 भारत सरकारने निवडणूक रोखे योजना 2018 राजपत्र अधिसूचना क्रमांक 20 द्वारे अधिसूचित केली. या योजनेतल्या तरतुदीनुसार, (राजपत्र अधिसूचनेच्या कलम 2 (डी ) मध्ये परिभाषित केल्याप्रमाणे ) भारतीय नागरिक हे निवडणूक रोखे खरेदी करू शकतात. व्यक्ती एकट्याने किंवा दुसऱ्या व्यक्तीसमवेत  संयुक्तपणे निवडणूक रोखे खरेदी करू शकते. जनप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 29 ए अंतर्गत नोंदणी झालेले राजकीय पक्ष ज्यांनी संसदेच्या किंवा राज्य विधानसभेच्या मागच्या सार्वत्रिक निवडणुकीतल्या मतांपैकी एक टक्यापेक्षा  जास्त मते प्राप्त केलेले राजकीय पक्ष  हे निवडणूक रोखे प्राप्त करण्यासाठी पात्र आहेत. पात्र राजकीय पक्ष केवळ अधिकृत बँकेच्या बँक खात्याद्वारेच निवडणूक रोख्याचे पैसे प्राप्त करू शकतील. 
भारतीय निवडणूक आयोगाने, आदर्श आचारसंहितेच्या दृष्टीकोनातून, विशिष्ट अटींसह  17 मार्च 2021ला  ‘ना हरकत’  प्रमाणपत्र दिले आहे. 
या अटी याप्रमाणे-

1) मतदान होणार असलेल्या मतदार संघात  कोणताही राजकीय पदाधिकारी  यासंदर्भात जाहीर भाषणात अथवा माध्यमे किंवा सार्वजनिक संवादादरम्यान याचा उल्लेख करणार नाही आणि

2) निवडणूक आयोगाने जारी केलेल्या  आदर्श आचारसंहितेच्या  संबंधित तरतुदीचे काटेकोर पालन करण्यात येईल.

विक्रीच्या सोळाव्या टप्यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या  (एसबीआय) 29 मान्यताप्राप्त शाखांना (जोडलेल्या सूचीनुसार ) 01.04.2021 ते  10.04.2021 या काळात निवडणूक रोखे जारी करायला आणि त्यांचे पैशात रुपांतर करण्यासाठी अधिकृत करण्यात आले आहे.
निवडणूक रोखे जारी केल्यापासून पंधरा दिवस वैध राहतील आणि वैधता कालावधी समाप्त झाल्यानंतर  कोणत्याही राजकीय पक्षाने हे रोखे जमा केल्यास त्या पक्षाला त्या रोख्यांचे पैसे प्राप्त होणार नाहीत याची नोंद घेण्यात यावी.
महाराष्ट्रात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या,  मुंबई मुख्य शाखा, मुंबई समाचार मार्ग, हॉर्निमन सर्कल,फोर्ट, मुंबई, पिन- 400001 शाखा कोड क्रमांक 00300 ही शाखा निवडणूक रोख्यांसाठी अधिकृत करण्यात आली आहे.
स्रोत -PIB

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.