Crime

स्टेट बॅंकेचे ATM गॅसकटरने फोडले, 17 लाख रूपये लुटले

स्टेट बॅंकेचे एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने कापून तब्बल 17 लाख रुपये लुटून नेल्याची घटना आज पालघर जिल्ह्यातील विरार येथे उघडकीस आलेली आहे. बुधवारी पहाटे हा प्रकार घडलेला असून गेल्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा असा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यापूर्वीही विरारमध्ये स्टेट बँकेचे (SBI) एटीएम फोडून पैशांची चोरी झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा असाच प्रकार घडल्याने शहरातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार पूर्वेला फुलपाडा येथील गांधी चौकातील एका इमारतीत स्टेट बॅंकेचं ATM आहे. चोरट्यांनी पहाटे गॅसकटरच्या साहाय्यानें हे ATM मशीन फोडून 17 लाख रूपयांची रोकड लंपास केली. सकाळी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना एटीएम फोडल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली असून सीसीटीव्ही कॅमेरा व इतर पुरावे गोळा केले जात आहे. एटीएम मशीनमध्ये पैसे ठेवण्यासाठी वापरला जाणारा पोलादी कप्पा हा अत्यंत मजबूत असतो. हा कप्पा फोडण्यासाठी चार ते पाच जणांची प्रचंड ताकद आणि अनुभवाची गरज असते.सराईत चोरट्यांनी पहाटे तीन ते चार वाजेच्या दरम्यान हे कृत्य केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.