मंत्रीमंडळ निर्णय

हंगामा ! नंतर आता विधानसभा अध्यक्षपदासाठी “मविआ”च्या जोरदार हालचाली

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात अध्यक्षांच्या दालनातच जोरदार हंगामा झाला. सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये चक्क धक्काबुक्की करण्यासह तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आलेला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपले मत सभागृहात मांडले. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजपच्या 12 गोंधळी आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमताने मंजूरही करण्यात आलाय. यामुळे भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलेल आहे.
सभागृहात ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना हा गोंधळ झालेला असून यात राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज भाजप आमदार आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी बारा आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलेल आहे. ते पुढील हिवाळी आणि पावसाळी अधिवेशनात सुद्धा सभागृहात येऊ शकणार नसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आता विधानसभा अध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीच्या जोरदार हालचाली

अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलेला असून या निवडणूकीसाठी व्हीप लागू होत नाही. तसेच मतदानही गोपनीय पद्धतीने होते. त्यामुळे ही निवडणूक घेताना महाविकास आघाडीच्या मनात आधी धाकधूक होती. अधिवेशनाची कार्यक्रमपत्रिका ठरविताना ही निवडणूक घेण्याचे नियोजन नव्हते. मात्र आता विधानसभेतील भाजपचे बळ हे 106 वरून बाराने कमी झालेले आहे. या निलंबनानंतर भाजपने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे साहजिकच महाविकास आघाडीसाठी ही परिस्थिती अनुकूल असल्याचे मानले जात आहे. यामुळे विधानसभा अध्यक्ष पदासाठी देखील निवडणूक होऊ शकते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.