कृषि

हतनूर धरणाचे 41दरवाजे उघडले,146860 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

दि-29/08/2020 जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि जिल्ह्यासाठी सिंचन व बिगर सिंचनाच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या अशा हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज दिवसभरात दमदार पाऊस झाल्याने आता रात्री 11 वाजेला हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आलेले असून यावर्षी 41 दरवाजे पहिल्यांदाच उघडण्यात आलाले आहे.त्यातून 146860 क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग तापीनदीपात्रात सोडण्यात येत आहे . त्यामुळे तापी नदी दुथळी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.नदीकाठी कोणीही कोणत्याही कामासाठी जाऊ नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे. तसेच आज धरणाची जलपातळी 210.170 मीटर पर्यंत पोहचलेली असून धरणात आज रोजी 202.10 दशलक्ष घनमीटर इतका जलसाठा शिल्लक आहे. लाॕकडाऊनमुळे यावर्षी रेल्वे , आयुध निर्माणी, दीपनगर वीजनिर्मीती केंद्र हे बंद असल्याने अशा जादा वापर असलेल्या ठिकाणी पाण्याचा वापर न झाल्याने जलसाठा मुबलक प्रमाणात शिल्लक आहे. तसेच भुसावळ, मुक्ताईनगर , बोदवड, यावल , रावेर , या तालुक्यातील 38 हजार हेक्टरवरील शेतीला याचा लाभ होणार असल्याची माहिती हतनूर धरणाचे उपअभियंता पी.एन. महाजन यांनी दिलेली आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.